yuva MAharashtra विनोद तावडे यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली मोठी जबाबदारी !

विनोद तावडे यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली मोठी जबाबदारी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आगामी सणासुदीच्या निमित्ताने एक महिना पुढे गेल्या असल्या तरी, महायुती आणि महाआघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणुका म्हटलं की, आरोप प्रत्यारोप काय करायचे ?या तयारीसह प्रचार दौऱ्याची आखणीही महत्त्वाचे असते. याबाबत महाआघाडीची एक बैठक मागील आठवड्यात संपन्न झाली. पाठोपाठ भाजपने हे काल राजधानी दिल्ली येथे एक महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्यावर काय जबाबदारी सोपवायची याचाही निर्णय झाला.

विनोद तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे बरे प्रस्थ. अलीकडे त्यांच्या शब्दाला बरेच वजन प्राप्त झाले आहे. यापूर्वी झालेल्या काही निवडणुकांमध्ये तावडे यांचीभूमिका संकटमोचकाची राहिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील हिरो म्हणून विनोद तावडे यांची भूमिका महत्त्वाची असणारच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


भाजपाचा 'पक्ष विस्तार' हा सध्या महत्त्वाचा विषय मानला जातो. त्यामुळे आगामी काळात भाजपा हा महाराष्ट्रसह संपूर्ण देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी पक्षाचे धोरण आहे. याची सुरुवात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून होत आहे.

काल झालेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमित शाह, राजनाथ सिंग, जे. पी. नड्डा ही त्रिमूर्ती उपस्थित होते. बैठकीचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या अन्य तीन राज्यातील निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे.