yuva MAharashtra सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने बदलापूर घटनेचा जाहीर निषेध !

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने बदलापूर घटनेचा जाहीर निषेध !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने जाहीर निषेध केला आहे. ही दुर्दैवी घटना ज्या कर्मचाऱ्याकडून घडली, तो कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेला होता. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याचे हमी संस्थेला देता येत नाही, ही भीती ओळखूनच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ कायम वेतनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती केली जावी अशी सातत्याने मागणी करीत आहे.

शिक्षण संस्थांच्याकडे असलेल्या अपुऱ्या निधीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सुरक्षिततेच्या साधनसामुग्रीचे विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देता येत नाही. शिक्षण संस्थांना मिळणारे वेतनेतर अनुदान हे अतिशय कमी आहे. या वेतनेतर अनुदानात सर्व सुविधा उपलब्ध करणे अवघड आहे. म्हणून शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन वेतनेतर अनुदानाची रक्कम वाढवावी, जेणेकरून अशा दुर्घटनांना पायबंध घालता येईल अशी मागणी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली आहे.

संस्थेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निषेध बैठकीस, आर. एस. चोपडे, विनोद पाटील, शिवपुत्र आरबोळे, भारत दुधाळ, दिग्विजय चव्हाण व प्रशांत चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.