Sangli Samachar

The Janshakti News

सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय; पृथ्वीराजबाबा पाटील यांचे गौरवोद्गार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
सर्वसामान्य टिंबर व्यापाऱ्याला कर्ज पुरवठा करून त्यांची पत वाढविणाऱ्या सांगली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात कार्पोरेट लूकची देखणी इमारत उभी केली आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे. संस्था व सभासद हितासाठी संचालक मंडळ, पदाधिकारी, व कर्मचारी यांच्या उत्तम समन्वयाने विश्वासहार्य कामगिरीमुळेच हे शक्य झाल्याचे कौतुकोद्गार काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काढले आहेत.

हा आदर्श इतर संस्थांनी घेण्यासारखा असल्याचे सांगून पृथ्वीराजबाबा म्हणाले की, ठेव संरक्षण योजनेची अंशदान रक्कम कमी करणे व पतसंस्थांची थकबाकी कमी होण्यासाठी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनला वसुली अधिकारी नेमण्याचा अधिकार पूर्ववत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. संस्थेने उभ्या केलेल्या नूतन इमारतीची पाहणी यावेळी पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केली. संस्था पदाधिकारी व संचालक यांच्याशी संवाद साधून पतसंस्थांच्या अडचणी समजावून घेतल्या.


यावेळी सांगली टिंबर मर्चंट्स पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र तातोबा मुळीक यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांचे स्वागत केले. मॅनेजर श्रीकृष्ण मोहिते यांनी यावेळी संस्थेची प्रगतीपर माहिती सादर केली. याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन यशवंत माळी, व्हा. चेअरमन किशोर रामजीभाई पटेल, संचालक अशोक मासाळे, बाबुभाई पटेल, सुरेश चौधरी, नितीन तावदारे, एम. एन. हुल्याळकर (मामा), प्रकाश निकम, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे आणि सेवक वर्ग उपस्थित होता.