Sangli Samachar

The Janshakti News

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, खा. श्रीनिवास पुजारी


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ ऑगस्ट २०२४
कोकण रेल्वेचे लवकरात लवकर भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे. सध्या कोकण रेल्वे महामंडळाकडून कोकण रेल्वेचे संचालन केले जाते. त्यामुळे भारतीय रेल्वे प्रमाणे कोकण रेल्वेच्या झोनमध्ये विकास कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण आवश्यक आहे असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.


यावेळी खा. कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर कोकण रेल्वे संबंधी अनेक विषयावर चर्चा केली. दरम्यान महाराष्ट्र व गोवा राज्यातील रेल्वे प्रवाशाकडून ही कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबत कोकण रेल्वेच्या उभारणीत मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा गोव्यातील लोकप्रतिनिधी दिल्लीत विलीनीकरणाचा मुद्दा किती प्रकर्षाने मांडतात यावर पुढील गोष्टी साध्य होणार आहेत.