| सांगली समाचार वृत्त |
पॅरिस - दि. १ ऑगस्ट २०२४
प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचे स्वप्न असतं. यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत असतात. आणि असं पदक मिळालं की मग त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. 'नेमबाजी म्हटलं की कोल्हापूर' हे एक समीकरण बनलं आहे. आणि याच समीकरणाचा एक भाग बनला तो, कोल्हापूरच्या मातीतला महावीर... स्वप्निल कुसळे. ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला पदक मिळवून देणारा स्वप्निल हा दुसरा ऑलिंपिक वीर बनला आहे.
50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी त्याने भारताला मनु भाकर आणि सरबज्योत सिंग नंतर भारताला आणखीन एक पदक मिळवून दिले. कोल्हापूरच्या या वीरांने 2024 च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये 451. 4 गुण नोंदवून इतिहास रचला आहे हा करिष्मा करत त्याने भारतासाठी कांस्यपदक मिळवून दिले पॅरिस ऑलिंपिक मधील भारताचे एकूण तिसरे पदक आहे त्याचप्रमाणे खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्निल कुसरे हा ऑलिंपिक पदक मिळवून देणारा दुसरा महाराष्ट्र वीर ठरला आहे. स्वप्निल कुसळे याच्यावर कोल्हापूर, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.