Sangli Samachar

The Janshakti News

वीराचार्य पतसंस्थेची वार्षिक सभा पारदर्शी कारभाराची साक्ष - भालचंद्र पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑगस्ट २०२४
वीराचार्य पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्व साधारण सभा आगळ्या वेगळ्या रूपाने सानंद संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दक्षिण भारत जैन सभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील व महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशन चे महा सचिव मा. श्री शशिकांत राजोबा सर यांचे उपस्थित सानंद संपन्न झाली.

संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचे, पारदर्शी कारभाराचे, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना त्यांच्या शंका, सूचनांचे केलेले निराकरण या सर्व गोष्टीमुळे वीराचार्य पतसंस्था पारदर्शी कारभारासाठी कटीबध्द असल्याचे दिसून येते, असे गौरवोद्वार काढले. 

सभेच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व्हा. चेअरमन श्री. मनोज भिलवडे यांनी केले. तसेच त्यागी, मुनि, सभासद, हितचिंतक, जवान तसेच महापूर सारख्या आकस्मिक आपत्तीप्रसंगी, ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना संचालक श्री. एम. ए. पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली. सभेपुढील नोटीस वाचन चेअरमन श्री. एन. जे. पाटील यांनी करून वार्षिक अहवाल वाचून संस्था ४०० कोटी ठेवीची पुर्तता करीत असून शुन्य टक्के एनपीएची परंपरा कायम राखून १३% लाभांश प्रस्तावित केल्याचे सांगितले. संस्था चालवत असताना सभासदांना कमी व्याजदरामध्ये कर्ज, ठेवीदारांना अधिक दराने व्याज व अधिक दराने लाभांश देणे यासाठी संस्थां निरंतर प्रयत्नरत असलेचे त्यांनी नमूद केले. 


यानंतर सभेपुढील विषयांचे वाचन संचालक सर्वश्री, अरूण कुदळे, मोहन नवले, अजितकुमार भंडे, अरूण पाटील, प्रकाश सांगावे, डी. के. पाटील, सुरेश चौगुले, जे. जे. पाटील, महावीर बा. पाटील, व्यवस्थापक शितल मसुटगे यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करणेत आले. 

मा. संचालक मंडळाचे वतीने सभासद उपयोगी विविध योजनांची व पतसंस्थापुढील आव्हाने याबाबतची माहिती व संस्थेच्या डिजीटल बैंकिंग सेवेचा सर्व सभासादांनी लाभ घेण्याचे आवाहन सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पकपणे उत्तरे देवून शंका समाधान केले. संस्था नफ्यातून एन पी ए सारख्या स्वनिधी उभारून सक्षम झाली आहे. संस्था वीराचार्यांच्या विचाराने अनेक सामाजिक उपक्रम राबवित असून समाजाभिमुख कार्य करण्यात अग्रेसर असलेचे नमूद केले. श्री. शशिकांत राजोबा सर यांनी केली. 

यावेळी प्रति तीन वर्षांनी दिला जाणारा सेवा गौरव प्रशस्ती संगणक विभाग अधिकारी श्री. शीतल खोत यांना देणेत आला. आभार प्रदर्शन सल्लागार सदस्य श्री. अनिल हवाणे यांनी केले. वंदेमातरम् या राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

यावेळी संस्थेचे संचालक सर्वश्री सुभाष मगदूम, मोहन लांडे, श्रीमती आशालता मुळे, सौ. अंजना गोरवाडे, महावीर कुचनुरे, सुनिल कोगनोळे, राजाराम हराळे, प्रकाश पोतदार, उत्तम कांबळे, सल्लागार सदस्य डॉ. सुरेंद्र ठिकणे, शितल सावळवाडे, भुपाल मगदुम व सभासद, हितचिंतक व सेवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन सचिन उपाध्ये यांनी केले. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला.