yuva MAharashtra स्व. बाळासाहेब गलगले सेवा पुरस्कार जाहीर, पुरस्कारामध्ये श्री. रावसाहेब पाटील व श्री. प्रकाश कांबळे यांचा समावेश ?

स्व. बाळासाहेब गलगले सेवा पुरस्कार जाहीर, पुरस्कारामध्ये श्री. रावसाहेब पाटील व श्री. प्रकाश कांबळे यांचा समावेश ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
सांगलीचे माजी उपनगराध्यक्ष व तत्कालीन जनसंघाचे वरिष्ठ नेते स्व. बाळासाहेब उर्फ लघवी गलगले यांच्या नावाने दिला जाणारे विविध सेवा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. या पुरस्कारामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे श्री रावसाहेब जनगोंडा पाटील यांचा, तर पत्रकारितेमध्ये दुष्काळी तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन, स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रकाश कांबळे यांचा समावेश आहे.

इतर पुरस्कारात, धर्म रक्षक पुरस्कार श्री मनोहर सारडा यांना देण्यात येणार आहे. क्रीडा सेवा पुरस्कार सौ माणिक शेखर परांजपे यांना, नगरसेवक पुरस्कार श्री वीर कुदळे यांना, शाहीर सेवा पुरस्कार शाहीर अनंतकुमार शिवाजी साळुंखे यांना, तर श्री सतीश कार्याप्पा दुधाळे यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.


हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांगली येथील टिळक स्मारक मंदिरात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली, आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.