yuva MAharashtra मातंग समाजाच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेणार : आमदार अमित गोरखे यांचे प्रतिपादन !

मातंग समाजाच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेणार : आमदार अमित गोरखे यांचे प्रतिपादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय आमदार अमित गोरखे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील समाज बांधवांशी तसेच जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना पदाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. समाजाचे प्रश्न अडचणी त्यांनी समजून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पुष्कराज चौक सांगली येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्यासंबंधी माहिती घेतली. या विषयाच्या अनुषंगाने माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांच्याशी आणि संबंधित प्रशासन यंत्रणेशी तातडीने बोलून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. 

महापालिके मध्ये बदली कामगारांच्या प्रश्नावरती व्यक्तिशः लक्ष घालून तो प्रश्न निकाली काढण्याचे सांगितले. झारी काम करणाऱ्या समाज बांधवांचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्यासंबंधी योग्य ती आवश्यक भूमिका घेऊ. सांगली जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जिल्ह्याच्या ठिकाणी यथोचित स्मारकाच्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक चर्चा झाली. एकूणच सांगली जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या प्रश्न अडचणी समस्या जाणून घेऊन हे सर्व योग्य पद्धतीने मार्गी लावण्याचे आश्वासन सन्माननीय आमदार अमित गोरखे यांनी दिले. 


सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी स्वागत केले. त्याचबरोबर, सांगली जिल्ह्यातील मातंग समाजाचे विविध प्रश्न आणि पुष्कराज चौकातील डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळ्यासंबंधीचा इतिहास समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वेसर्वा, कबड्डीचे राष्ट्रीय पंच आकाश तिवडे (मेजर) यांनी सांगितला. यावेळी आमदार अमित गोरखे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांची विचार पुस्तके भेट देण्यात आली. 

यावेळी जयंती महोत्सव समितीचे जिल्हा सचिव मिलिंद कांबळे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ वर्ग ड जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे, उपाध्यक्ष विनोद तिवडे, मातंग चेतना परिषदेचे अभिमन्यू भोसले, सचिन केंचे, झाकीर भाई नदाफ सुबराव मोहिते, दत्ता काळे, चिंगू ताई कसबे,विकास आवळे, राजू मगदूम,सतीश बल्लाळ, दीपक शिंदे, रावजी घाडगे, संजय आवळे, दादासो कांबळे, रवि मोहिते, ज्ञानेश्वर केंगार याबरोबरच मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.