| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांच्या शुभहस्ते मिरजेतील सुदर्शन ॲल्युमिनियम इंडिया लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रोनक शाह यांच्या आमंत्रणास मान देऊन कंपनीस भेट दिली. कंपनीत उभारण्यात आलेल्या अनोडायझिंग प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
श्रीफळ वाढवून व पूजा करून यावेळी निकमसाहेबांनी प्लांटचे उद्घाटन करुन सदिच्छा व्यक्त करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कंपनीत चालू असणाऱ्या सर्व कार्याची पाहणी केली. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रोनक शाह यांनी कंपनीत सुरू असणाऱ्या सर्व कामाची माहिती यावेळी साहेबांना दिली, त्याचबरोबर व्यवसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे सामाजिक क्षेत्राची माहिती यावेळी निकम साहेबांनी जाणून घेतली.
रोनकजी कंपनीबरोबर स्वतःचे एक सामाजिक फाउंडेशन ही चालवतात ज्या फाउंडेशन फाउंडेशन चे नाव आहे संवेदना फाउंडेशन या फाउंडेशन अंतर्गत चालू असणारे सामाजिक कार्य मानसवर्धन पुनर्वसन केंद्र, संवेदना गौशाळा आणि गौशाळा उत्पादने याबद्दल देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर रोनक शाह, संवेदना फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ पुनम रोनक शाह, श्रेयसजी आणि इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.