| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
केरेवाडी आरेवाडी येथील दरोडेखोर पळून जात असताना जीवाची परवा न करता त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण गिल्डा आणि पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये एका अल्पवयीनासह चार संशयिताना अटक करून ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून 1.17 लाखांचा मध्ये माल जप्त करण्यात आला. या धाडसी कामगिरी बाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले.
खेरेवाडी आरेवाडी येथे दरोडा टाकून पळून जाणाऱ्या चोरट्यांची माहिती डायल 112 वर मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत कवठेमंकाळ पोलीस ठाण्यातील हवलदार पांडुरंग वाघमोडे, नाईक अभिजीत कासार, चालक संतोष पाटील, मिरज उपाध्यक्ष कार्यालयातील अक्षय जाधव चालक तात्यासाहेब उमासे यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना महानिरीक्षक फुलारी यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आली.
अवघ्या 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचून या सर्वांनी संशय त्यांचा पाठलाग केला आणि या सर्वांना ताब्यात घेतले. या घटनेत पोलिसांनी जी धाडसी कामगिरी केली, त्यामुळेच गुन्हेगार सापडू शकले. पोलिसांच्या या धाडसाचे जनतेतूनही कौतुक होत आहे