yuva MAharashtra राजकारणाचे संदर्भ बदलले. जाती-धर्माच्या नावाखाली देश विभागला जात आहे - तुषार गांधी

राजकारणाचे संदर्भ बदलले. जाती-धर्माच्या नावाखाली देश विभागला जात आहे - तुषार गांधी


| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. १२ ऑगस्ट २०२४
सध्याचे राजकारणाचे संदर्भ बदलले चालले आहेत. द्वेषाच्या राजकारणातून देश विभागला जात आहे. चार चाकी गाड्या भोवती सुरक्षा कडे, महागडे गॉगल, ब्रँडेड कपडे म्हणजे मोठा राजकारणी असे समजले जाते. 'झोला लेके आये थे जोला लेके जायेंगे |' असे उघडपणे बोलले जाते. पण झोला आणला कितीचा आणि घेऊन चालला किती ते तर सर्वांना कळू द्या असा टोला तुषार गांधी यांनी राजकारण्यांना लगावला आहे.

विट्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी यंदा महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांना जाहीर झाला होता. ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते काल विटा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात आला, यावेळी तुषार गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरील भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव म्हणाले की, महात्मा गांधीजींनी भारत जोडो अभियान राबवले होते त्यानंतर त्यांचे पण तू तुषार गांधी यांनी देखील अशा प्रकारे काही वर्षांपूर्वी अभियान राबवले. अशाच पद्धतीने त्याच प्रेरणेने राहुल गांधी यांनी देखील भारत जोडो अभियान राबवण्याचे महाराज यांनी सांगितले. 


तुषार गांधी यावेळी बोलताना पुढे म्हणाले की आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी हिंदू मुस्लिम या समाजामध्ये निर्माण करीत आहेत. विशाळगड आणि धारावी ही त्याची उत्तम उदाहरणे म्हणावे लागतील, असेही तुषार गांधी म्हणाले.

यावेळी ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. बाबुराव गुरव, संपतराव पवार, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.