yuva MAharashtra महाराष्ट्रातील निवडणुका लांबल्या, आता ऐन थंडीत निवडणुकीच्या वातावरण तापणार !

महाराष्ट्रातील निवडणुका लांबल्या, आता ऐन थंडीत निवडणुकीच्या वातावरण तापणार !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १६ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचे विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये एकत्रित होणार असल्याची शक्यता मावळली असून आता महाराष्ट्रातील निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने काल एका पत्रकार बैठकीमध्ये हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या. याबाबत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामुळे या काळात मतदार मतदान करण्यासाठी तयार होण्याची शक्यता कमी असते. याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच त्या निवडणुका हरियाणा राज्याच्या निवडणुकी बरोबर घेतल्या गेल्या नाहीत.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे या निवडणुका नोव्हेंबरच्या आठवड्यात घेता येऊ शकतात. परंतु हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये तत्पूर्वी घेणे आवश्यक आहे. या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. पैकी पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला कोणाला असून, दुसऱ्या टप्प्याचे मतदान 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. 4 ऑक्टोंबर ला मोजणी होऊन तेथे नवीन सरकार सरकारवर होतील.

या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला आपण केलेल्या विकास कामांची जाहिरात मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, लाडका भाऊ, वयोश्री योजना याचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार असल्याने त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. मतदारांमध्ये विद्यमान सरकार बाबत जी संतापाची लाट आहे ती सुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे युती सरकारातील पक्ष खुष आहेत. 

महाविकास आघाडीच्या गटात मात्र निवडणुका पुढे गेल्याने चलबिचल वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाबतीत मतदारांमधील असलेली नाराजी मतदान यंत्राद्वारे प्रगट झाली होती. ऑक्टोंबर मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर विधानसभा निवडणुकीतही ही नाराजी व्यक्त होण्याची शक्यता होती, ती कदाचित निवडणुका पुढे गेल्याने कमी होऊ शकते. 

अर्थात गणेशोत्सव, दसरा व दिवाळी हे महत्त्वाचे सण या दरम्यान येणार असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी हात ढिला सोडावा लागणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मात्र ही निवडणूक अधिक खर्चाची होऊ शकते. त्यामुळे निवडणूक पुढे गेल्याने काही खुशी कभी गम असा माहोल निर्माण झाला आहे...