| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याबाबत कोणालाही हौस नसते, मात्र सदर रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान हे व्यावसायिक व्यापारी उद्योजक यांचे झालेले आहे. तसेच खानापूर, आटपाडी, तासगाव, विटा या भागातून येणाऱ्या तसेच आमच्या बुधगाव, माधवनगर, बिसूर, कवलापूर या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे असे प्रतिपादन सांगली सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले आहे.
सतीश साखरकर यांचे मनोगत !
यातून जिल्हा प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल यांनी बोध घेऊन लवकरात लवकर सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे आवाहन सतीश साखरकर यांनी केले आहे.
तसेच इथून पुढे कोणतीही पूर्व सूचना न देता गमिनी काव्याने सदर पूलाचे ठेकेदार असतील, अधिकारी असतील, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील, यांच्या घरासमोर त्यांच्या कार्यालयात घुसून किंवा अन्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्यावर राहणार आहे, असे सतीश साखळकर गजानन साळुंखे, उमेश देशमुख, नितीन चव्हाण व सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा यांनी इशारा दिला आहे.