yuva MAharashtra खा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसाचा फ्लेक्स उतरवल्याने मिरजेत ठिय्या आंदोलन !

खा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसाचा फ्लेक्स उतरवल्याने मिरजेत ठिय्या आंदोलन !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १३ ऑगस्ट २०२४
मिरज शहरातील खा. विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा फ्लेक्स महापालिकेने विनापरवाण्याचे कारण देत हटवल्याने, खा. विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते महापालिका गेट जवळ जमले आणि 'जोपर्यंत महापालिका प्रशासन येथे येऊन माफी मागत नाही, आणि खा. विशाल पाटील यांच्या वाढदिवसाचे हटवलेले फ्लेक्स पूर्ववत लावत नाही, तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या दरवाजातून हटणार नाही अशी भूमिका घेत' ठिय्या आंदोलन सुरू केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज खा. विशालदादा पाटील यांचा वाढदिवस. साहजिकच त्यांच्या चाहत्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे, मोठमोठे फ्लेक्स मिरज शहरात लावण्यात आले होते. महापालिका अतिक्रमण विभागाने 'विनापरवाण्याचे कारण' देत, हे फ्लेक्स हटवल्याने खा. विशालदादा पाटील प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. ही सारी मंडळी महापालिकेच्या गेट जवळ जमले आणि खा. विशालदादा पाटील यांचा जयघोष करीत, सदरचे फ्लेक्स पुन्हा लावल्याशिवाय, आणि महापालिका प्रशासनाने याबद्दल माफी मागितल्याशिवाय आम्ही जागचे हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. 


याबाबत माध्यमांशी बोलताना आंदोलक म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विशालदादांनी मिळवलेला गगनचुंबी विजय, आणि राजधानीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेमध्ये विशालदादांचे गाजलेले पहिलेच भाषण यामुळे विरोधकांचा पोटशुळ उठला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही विरोधी पक्षांना याचा फटका बसू शकतो, याचा धसका घेऊन महापालिका यंत्रणेला हाताशी धरीत, खा. विशालदादांचे फ्लेक्स हटवण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान महापालिकेकडून याबाबत कोणताही संध्याकाळपर्यंत करण्यात आलेला नव्हता. तसेच कोणी अधिकारीही तिकडे फिरकले नव्हते. याबद्दलही खा. विशाल दादा प्रेमी कार्यकर्त्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.