Sangli Samachar

The Janshakti News

कोणीही मला फोन किंवा मेसेज करू नये, सुप्रिया सुळे यांच्या पोस्टने खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. १२ ऑगस्ट २०२४
राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या व राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांची प्रतिमा आहे असे शरद पवार यांची कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे कोणीही मला फोन अथवा मेसेज करू नका असे आवाहन सौ. सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला. सौ सुळे यांच्या बाबतची ही पोस्ट संपूर्ण राज्यात वायरल झाले आणि चर्चेला उधान आले.

परंतु यामागील खरे कारण सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाउंट वरून या संदर्भातील माहिती दिली आणि याबाबतच्या विविध दिशांनी होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, आपला फोन आणि व्हाट्सअप हॅक झाले आहे, त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी. आपण याबाबत पोलिसात तक्रार केली असून, माझा फोन व व्हाट्सअप हॅक करणाऱ्याचे नाव समोर येईलच, पण तोपर्यंत कोणीही मला फोन अथवा मेसेज करू नये असे आवाहन सो सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


राजकारण्यांचा फोन व अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचे डिजिटल डिवाइस हॅक करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यावरील माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या फ्रोजनच्या माध्यमातून घुसकोरी करण्याचे आरोप अनेक नेत्यांनी केले आहेत. मागील महिन्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेळोगोपाल यांनीही एक्स वरून आरोप करताना म्हटले होते की, मोदी सरकार त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचा मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या आयफोनवर ॲपल कंपनीकडून या संदर्भात सावधगिरी बाळगण्याचा मेल आल्यानंतर हा प्रकार उघड केस आल्याचे वेळोगोपाळ यांनी म्हटले होते. याच्या पुष्ठर्थ वेणू गोपाळ यांनी त्यांना आलेल्या सूचनेचे स्क्रीन शॉटच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर जोडले होते. त्यावेळीही मोठे खळबळ माजली होती.

स्पायवेअर हल्ल्याद्वारे अनेकांना लक्ष्य केले जात असून एप्पल आयडीशी लिंक केलेल्या आयफोनवर अशी सूचना 98 देशांमधील युजर्सना पाठवली गेली आहे. आतापर्यंत आपण दीडशेहून अधिक देशांमधील युजर्सना या संदर्भात सावध केले आहे. मागील अनेक महिन्यापासून एनएसओ या इसरायली भाडोत्री कंपनीने तयार केलेले पेग्यासच हे स्पाय वेअर भारतात बरेच ठिकाणी चर्चेत आहेत याचाच वापर करून केंद्र सरकार विरोधकावर पाळत ठेवत असल्याचा आरोप होत आहे.

आता सौ. सुप्रिया सुळे यांचा फोन व व्हाट्सअप कोणी हॅक केले याबाबतचे चर्चा रंगली असून, पोलीस लवकरच याचा शोध घेऊन माहिती काढतील असे सौ. सुळे यांनी म्हटले आहे.