Sangli Samachar

The Janshakti News

तीन लाख कोटींचा निधी खर्च करून रस्त्यांचे जाळे अधिक व्यापक करणार - नितीन गडकरी


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ४ ऑगस्ट २०२४
'एक व्हिजन असलेले नेते' म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. गत दोन्ही वेळच्या मोदी सरकारमध्ये रस्ते वाहतूक मंत्री राहिलेले गडकरी यांच्यावर या टर्ममध्येही रस्ते वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अत्यंत सक्षमपणे ही जबाबदारी पार पडत नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षात, रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण तरी त्यांनी देश जोडण्याचे काम केले आहे. आता त्या तीन महिन्यात तीन लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केले आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की लोकसभा निवडणुकीमुळे मागील तीन महिन्यात हे काम थोडे संथ झाले होते. परंतु आता आगामी काळात देशातील रस्त्यांचे हे जाळे अधिक व्यापक करण्यात येतील. या आर्थिक वर्षात रस्ते मांडणीत पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.


अलीकडच्या काळात NHAI टोल मधून 45 हजार कोटी रुपये कमवत आहेत. हे त्या दोन वर्षात ही कमाई 1.4 लाख कोटी रुपये पोहोचेल असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की रस्त्यांच्या मालमत्तेचे मोदरीकरण केले जात आहे, त्यामुळे मंत्रालयाला चांगले उत्पन्न मिळत आहे. म्हणूनच आमच्याकडे निधीची कमतरता नाही. याचा वापर करून आगामी काळात देशाला अधिक चांगले रस्ते निर्माण करून देण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.