Sangli Samachar

The Janshakti News

१६ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ ऑगस्ट २०२४
दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले असून, ही निवडणूक कोणत्याही मतभेदाशिवाय एकत्रितपणे लढण्याचा निर्धार केला असून, येत्या 16 ऑगस्ट रोजी मुंबई येथील षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची समन्वय बैठक संप यामध्ये धोरणात्मक चर्चेवर अधिक भर देण्यात आला. महाविकास आघाडीने राज्यात उत्तम सरकार दिले हे जनतेला ठाऊक आहे. संकटाच्या काळात आमच्या सरकारने जे काम केले त्याची नोंद केवळ राज्यानेच नव्हे तर देशानेही घेतले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील नेत्यांनी धोरणात्मक चर्चा करून किमान समान कार्यक्रमावर निवडणुकीस सामोरे जायचे निश्चित केले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहीरनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. 16 ऑगस्ट रोजी जन्मकानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा होईल. त्याचप्रमाणे 20 ऑगस्टला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीचे आणि मोठ्या रॅलीचे आयोजन आम्ही केले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

16 ऑगस्ट रोजीच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. असे सांगून वडेट्टीवर म्हणाली की एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीने त्याचा शुभारंभ महाराष्ट्रातील या मेळाव्यातून होणार आहे. काल झालेली चर्चा महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे ध्येय ठेवून सकारात्मकरित्या संपन्न झाली. तिन्ही पक्ष मिळून या महाराष्ट्राचारी सरकारला उलथवून लावायचे हे नक्की झाले आहे, असेही वडेट्टीवर म्हणाले.

यावेळी शिंदे सरकारवर टीका करताना वडेट्टीवर म्हणाली की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? शिंदे सरकारने तो गुजरातकडे गहाण ठेवण्याचं काम केले आहे. 40 टक्क्यापर्यंत सरकारची कमिशनखोरी झाली असल्याचा आरोप करून जनता निवडणुकीची वाट पाहत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. यासाठीच आज धोरणात्मक चर्चा होऊन जाहीरनामा आणि किमान समान कार्यक्रम याचा निर्णय झाला आहे.

फसव्या योजनांना महाराष्ट्रातील जनता आता फसणार नाही, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले की, विद्युत बिल वाढवून सर्वसामान्यांकडून वसुली केली जाते आहे. पंधरा हजारापेक्षा अधिक मुली राज्यात बेपत्ता आहेत. मुलींची सुरक्षितता जे सरकार घेत नाही ते महिलांना पंधरा हजार रुपये महिना देण्याचे आमिष दाखवत आहे. महिलावरील अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे तुटपुंज्या आर्थिक मदतीपेक्षा महिलांची सुरक्षितता ही अधिक महत्त्वाची आहे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.