yuva MAharashtra आधार कार्डवर बदल करायचा आहे ? मग नवीन नियमानुसार ही कागदपत्र तुमच्याकडे हवीतच !

आधार कार्डवर बदल करायचा आहे ? मग नवीन नियमानुसार ही कागदपत्र तुमच्याकडे हवीतच !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ ऑगस्ट २०२४
मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून पासपोर्ट काढण्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. अगदी शाळा प्रवेशापासून ते शासनाच्या अनेक योजनांसाठी अत्यावश्यक मानले जाते. ते अप टू डेट नसेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणीचे ठरू शकते. मात्र आता यामध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करणे पूर्वीप्रमाणे सहज साध्य राहिलेले नाही. आता आधार कार्ड वर कोणताही बदल करायचा असेल तर, ही प्रक्रिया केंद्र सरकारकडून अधिक क्लिष्ट करण्यात आली आहे.

आधार कार्ड वरील आपले नाव, पत्ता, जन्मतारीख यामध्ये बदल करायचा असल्यास आपल्याकडे जन्मतारीख किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. जर तुमच्याकडे तो नसेल तर आधार कार्ड वरील बदल करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट सहजासहजी उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे आशा नागरिकांना हा नियम अडचणीचा ठरू शकतो. परंतु केंद्राने यासाठी पर्याय आहे उपलब्ध करून दिला आहे. ज्यांच्याकडे जन्म तारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल अशा नागरिकांनी एमबीबीएस डॉक्टरने किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याने अटेस्टेड केलेले पत्र यासाठी जोडण्याची मुभा आहे. परंतु हे पत्रही इतक्या सहजासहजी उपलब्ध होईल, याचीही खात्री नाही.


आणि म्हणूनच आपल्यला जर आधार कार्ड वर काही बदल करायचा असल्यास प्रथम जन्म तारखेचा शाळा सोडल्याचा दाखला सोबत ठेवा, म्हणजे तुमचे धावपळ वा मनस्ताप होणार नाही.