Sangli Samachar

The Janshakti News

पंढरपूरच्या विठूमाऊलीसह रुक्मिणी मातेची पूजा भाविकांना घरबसल्या करता येणार !



| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २९ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्रातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठू माऊली तसेच रुक्मिणी मातेची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन ओटीपूजा चंदन उटी पूजा इत्यादी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत असतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने आता संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेचे नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला. सदर नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून भाविकांना पूजेची नोंदणी मंदिराच्या अधिकृत  https://www.vitthlrukminimandir.org या मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. भाविकांना अल्प देणगी मूल्य आकारून विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


सदर पूजांचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत भाविकांकडून अनेक दिवसांची मागणी होती. याबाबत प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून येत्या एक ऑक्टोंबर 2024 पासून ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना यापुढे घरबसल्या पूजा नोंद करता येईल असे व्यवस्थापक मनोज स्तोत्री यांनी सांगितले आहे.