yuva MAharashtra शैक्षणिक व्यासपीठ मोर्चा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा - रावसाहेब पाटील

शैक्षणिक व्यासपीठ मोर्चा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा - रावसाहेब पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ ऑगस्ट २०२४
शैक्षणिक व्यासपीठ मोर्चा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ सांगलीचा पाठिंबा असल्याची माहिती अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत आज मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या प्रामुख्याने जिल्हा शिक्षण संस्था संघटनेचे हे आहेत त्यामुळे शिक्षण संस्था संघ आपला पाठिंबा जाहीर करत आहे असे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


शैक्षणिक व्यासपीठाने आपल्या विविध मागण्यासाठी सरकार दरबारी अनेक प्रयत्न करून देखील, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या मागणीमध्ये प्रामुख्याने शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनुदान टप्प्याचा विचार न करता 100% अनुदान देण्यात यावे, पवित्र पोर्टल वरील नोंद केलेल्या शिक्षकांची नियुक्ती करावी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वेतनावर नियुक्ती करावी रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी भरती परवानगी द्यावी, इत्यादी मागण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठ संघटनेतर्फे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.