| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका शाळेमध्ये विध्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेतली असता, महापालिका प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये अध्यापन स्तर वाढविण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत नोंदवून
दि.०१/०८/२०२४ रोजीची मंगलधाम मनपा कार्यालय सांगली येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त शुभम गुप्ता यांनी विद्यार्थी अध्ययनस्तर निश्चित करण्याबाबत मनपा शिक्षण विभाग व डाएट सांगली यांच्या वतीने अनुभवी शिक्षक व केंद्रसमन्वयक यांच्याशी चर्चा करून डाॅ.रमेश होसकोटी प्राचार्य डाएट सांगली व सर्व अधिव्याख्याता यांनी नियोजन केले आहे.
शासनाचा बालवाडी ते तिसरी या वर्गाचा भाषा व गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार असून त्यावर शाळा स्तरावर कामकाज सुरु आहे. चौथी ते आठवी पर्यत भाषा व गणित विषयांचे अध्ययन स्तर तयार करणे व इयता पहिली ते आठवी या वर्गाचे इंग्रजी विषयांचे नव्याने अध्ययन स्तर तयार करण्यात यावे, यावर कार्यक्रम निश्चित करून प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले आहे.
के.पी.शहा विद्यालय सांगली. मा.आयुक्तसो यांनी सांगितलेल्या बाबीचा विचार करुन, भाषा, गणित, इंग्रजी, उर्दू व कन्नड या विषयांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी विविध विषयाचे गट तयार केले असून, त्यांचा वर्ग व विषय वाटप कशा पध्दतीने तयार करता येईल, यावर सर्व तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती. त्यानुसार सविस्तर कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक विषयाचा एक प्रमुख शिक्षक नेमण्यात आला, त्यानुसार कामकाज करण्यात येत आहे. तज्ञ शिक्षकांना वेळ देवून त्याबाबतचे कामकाज केले असून, त्यामध्ये काय बदल असेल तर सुचित करण्यात आले.
वेळोवेळी शिक्षकाच्या बैठकी घेऊन कार्यक्रमात काही त्रुटीबाबत तज्ञ शिक्षक व प्रशासन अधिकारी श्री.रंगराव आठवले यांनी मार्गदर्शन केले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत. श्री.शंकर ढेरे (गणित), श्रीमती सुनिता देवके (मराठी), श्रीमती मजुंषा सुर्यवंशी (इंग्रजी), श्री.असद पटेल (उर्दू),
शाळास्तरावर घेतलेल्या चाचण्यानुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक लक्षात घेऊन जे मूल अध्ययनात कमी आहे अशा मुलांना वेगळे करुन त्यांची तयारी करुन घेणेसाठी अध्ययनस्तर कृती आराखडानुसार दिलेल्या कृतीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सराव देऊन त्यांचा अध्ययनस्तर वाढविणेसाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तरामध्ये वाढ झाली आहे त्या विद्याध्यांची गणना वरील निकषामध्ये करणेत येणार आहे.
सर्व मुलांचे अध्ययन पुर्ण झाल्यानंतर ९० दिवसाचा कृती आराखडा तयार करुन जी मुले अभ्यासात मागे आहेत. त्यांच्यासाठी शाळा स्तरावर विषय शिक्षक कामकाज करण्यात येणार आहे. कालावधी पूर्ण झाल्यावर एक अंतिम परीक्षा घेण्यात येणार असून, या उपक्रमासाठी श्री. शुभम गुप्ता आयुक्त मनपा सांगली, श्रीमती शिल्पा दरेकर उपायुक्त मनपा सांगली. श्री.रंगराव आठवले प्रशासन अधिकारी मनपा सांगली. श्री.रमेश होसकोटी. प्राचार्य डाएट सांगली व सर्व आधिव्याख्याता, श्री.गजानन बुचडे लेखापाल, श्री.सतिश कांबळे सहा. कार्यक्रम अधिकारी, सर्व समन्वयक मनपा शिक्षण विभाग सांगली. अध्ययन स्तर तज्ञ मार्गदर्शक व शिक्षक सहभागी होऊन काम करत आहेत.
९० दिवसाच्या कार्यक्रम ,
५३९८ विध्यार्थी सहभागी,
२०२ शिक्षक ,५१ मनपा शाळा सहभागी,
१ ते ८ पर्यत वर्गासाठी नियोजन.
२० डिसें २०२४ रोजी अंतिम प्रगती कळणार.