Sangli Samachar

The Janshakti News

चिन्मय मिशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
चिन्मय मिशन ही जागतिक स्तरावर असलेले अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे संस्था असून संस्थेमार्फत भगवत गीतेचा प्रसार होऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान, स्मरणशक्ती वाढवून, त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यासाठी भगवत गीता पठण स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असतात या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदा स्पर्धेसाठी गीता अध्याय पाचवा (कर्मसन्यास योग) निवडलेला आहे.

यासाठी खालील प्रमाणे गट तयार करण्यात आले आहेत. नर्सरी लहान व मोठा गट (श्लोक एक ते पाच), पहिली व दुसरी (श्लोक एक ते आठ), तिसरी व चौथी (श्लोक एक ते बारा), पाचवी व सहावी (श्लोक एक ते १५), सातवी ते नववी (श्लोक एक ते 18) आणि दहावी ते बारावी (श्लोक एक ते वीस).


या स्पर्धेची प्राथमिक फेरी 22-09-2024 रोजी सकाळी नऊ वाजता होणार असून अंतिम फेरी दिनांक 06-10-2024 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख 15-09-2024 ही असून, प्रत्येक गटातून तीन बक्षिसे/ पत्र दिले जातील. तर प्रत्येक गटातून पाच स्पर्धक विभागीय (सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगावी जिल्हे) स्पर्धेसाठी दि. 11-01-2025 रोजी चिन्मय आश्रम ( चिन्मय गणाधीश) टोप संभापूर येथे पाठवण्यात येतील. तरी या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन चिन्मय आश्रम सांगलीतर्फे करण्यात आले आहे.