| सांगली समाचार वृत्त |
अलाहाबाद - दि. २१ ऑगस्ट २०२४
सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनी अलाहाबाद न्यायालयात काँग्रेसच्या सर्व 99 खासदारांना अपात्र ठरवून, काँग्रेसची मान्यता काढून घ्या, अशी याचिका दाखल केली होती. परंतु याचे याचिकाकर्त्यांनी पुरेशी माहिती दिली नसल्याच्या कारणामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रात सरकार आल्यानंतर दर महिन्याला साडेआठ रुपये हजार रुपये देऊ असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मा. न्या. मनोज कुमार गुप्ता आणि मा. न्या. मनीष कुमार निगम यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेऊन, याचे केत पुरेशी माहिती नसल्याचे कारण देत ही याचिका फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हटले आहे की संपूर्ण तथ्यासह पुन्हा एकदा जनहित याचिका करण्याची, इच्छा सन्माननीय न्यायाधीशांसमोर व्यक्त केली, तेव्हा न्यायालयाने यासाठी सूट असल्याचे सांगितले. तेव्हा आता भारती सिंह संपूर्ण माहिती सह पुन्हा एकदा जनहित याचिका दाखल करतात का ? याकडे काँग्रेससह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.