| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० ऑगस्ट २०२४
काँग्रेसच्या खटाखट ठकाठक शब्दावरून आलाहाबाद उच्च न्यायालयात काँग्रेस पक्ष विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये तीन प्रमुख मागण्या करण्यात आले आहेत. पक्षाच्या 99 खासदारांना अपात्र ठरवावे, निवडणूक चिन्ह जप्त करावे आणि तिसरी मागणी पक्षाची नोंदणी रद्द करावी, असा याचिकेत समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनीही याचिका दाखल केली असून त्यांचे वकील ओ. पी. सिंह आणि शाश्वत आनंद यानी ही जनहित याचिका दाखल केले आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस पक्षाने गरीब, मागास, दलित आणि अल्पसंख्याकांना दरमहा 8,500 रु. आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनीही त्यांच्या जाहीर सभांमधून या पद्धतीने आश्वासन दिले होते. मात्र ही आश्वासन न पाळता मतदारांचे दिशाभूल केली आहे असेही याचिकेत म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या स्वाक्षरी असलेल्या वचनाम्यावरही मतदारांना अशाच प्रकारे आश्वासन दिले होते. त्यामुळे या माध्यमातून मतदारांना आमिष दाखवण्याचाच हा प्रकार असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना भारती सिंह म्हणाल्या की निवडणूक आयोगाने दोन मे 2024 रोजी निवडणुकीतील प्रलोभनाबाबत नोटीस जारी केले होते. परंतु काँग्रेस पक्षाने त्यावर कोणतीही उत्तर दिले नाही. काँग्रेसने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 121 (एक) (ए) याचे उल्लंघन केल्याचेही याचिकेत आम्ही नमूद केले आहे. भारतीय दंड संहिता नुसार हा दंडनीय गुन्हा आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगालाही कारवाई करण्याबाबत पत्र लिहिले होते परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात याबाबत सुनावणी होऊ शकते. ही याचिका दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायालयाने या विरोधात निकाल दिला तर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? काँग्रेस पक्ष त्या विरोधात आपली दाखल करणार का ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.