| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
देशातील पिवळ्या व केशरी कलरच्या 90 कोटी जनतेला रेशन कार्ड वरून मोफत रेशन दिले जात आहे. यामध्ये यांचे प्रमुख अन्न असलेल्या तांदळाचा समावेश होता. परंतु आता केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे या नागरिकांना मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याऐवजी गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.
केंद्र शासनामार्फत गोरगरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना गॅस सिलेंडरसह अनेक वस्तू मोफत देण्यात येतात. रेशन कार्ड वरील गहू तांदूळ यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. नागरिकांतून याबाबत समाधान ही व्यक्त होत होते. मात्र आता भारतीयांचे मुख्य अन्न असलेले तांदूळ बंद झाल्याने याचे पडसाद नागरिकांतून कसे उमटतात, याबाबत चर्चा सुरू आहेत.
महाराष्ट्रसह अन्य तीन राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे रेशन कार्ड वरील या बदलाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहणेही उत्सुक याचे ठरणार आहे. त्यामुळे तांदूळ बंद करण्याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर घ्यावा असे महायुतीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. आता केंद्र शासनाकडून यावर कसा प्रतिसाद मिळतो त्यावरूनच पुढील दिशा ठरणार आहे.