yuva MAharashtra मोदींनी उघडली महाराष्ट्रासाठी तिजोरी, 30 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 8000 कोटी मंजूर !

मोदींनी उघडली महाराष्ट्रासाठी तिजोरी, 30 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 8000 कोटी मंजूर !


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ४ ऑगस्ट २०२४
पुणे नाशिक हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा महामार्ग. या मार्गावरील वाहतुकीची गरज लक्षात घेता, या दोन्ही ठिकाणांना जोडणारा तीस किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॅरिडोर उभारण्याची आवश्यकता होती. रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबतचे गरज लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी या योजनेस मंजुरी दिली आहे आणि तब्बल 8000 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. 

बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा मार्ग तयार होणार आहे येथे आठ पदरी उड्डाणपुलाच्या निर्मितीला ही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि खेळ दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सध्या नाशिक फाटा ते खेड दरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा दरम्यान चाकण औद्योगिक वसाहत असून येथील तज्ञांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो त्यामुळे या एलिव्हेटेड कॅरीडोरचा मोठा फायदा होणार असून ही वाहतूक कोंडी कमी होणार आहे. विशेष म्हणजे यासाठीच्या भूसंपादनासाठी कार्यवाही सुरू झाली असून प्रत्यक्ष कामास ऑक्टोंबर पासून सुरुवात होईल अशी माहिती देण्यात आली आहे. 


30 किलोमीटरच्या या एलिव्हेटेड कॅरीडोरचा खर्च साधारणपणे सात हजार 827 कोटी रुपये अपेक्षित आहे. वाढीव खर्च लक्षात घेता केंद्राने आठ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. नाशिक फाटा ते खेड दरम्यान आठ पदरी महामार्ग बांधला जाणारा असून, सध्याचा चार पदरी रस्ता सहा पदरी केला जाईल. दोन्ही बाजूला सर्विस रोड असतील. या मार्गामुळे पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड, चाकण आणि खेड मधील विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुणे नाशिक प्रवास अधिक सुखकर होण्याबरोबरच, ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमधील लॉजिस्टिक्सची क्षमताही वाढणार आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होईल, असे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी म्हटलं आहे