yuva MAharashtra 'समान नागरी कायदा' व 'वन नेशन वन इलेक्शन' बाबत भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत !

'समान नागरी कायदा' व 'वन नेशन वन इलेक्शन' बाबत भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १६ ऑगस्ट २०२४
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समान नागरी कायदा' व 'वन मिशन वन इलेक्शन' याबाबतचा कायदा होण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनेक वेळा समान नागरी कायद्यावर चर्चा केली आहे.
 ज्या नागरी कायद्याला घेऊन आपण जगत आहोत, तो एक प्रकारे सांप्रदायिक कायदा असून समाजात भेदभाव करणारा आहे. संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या गंभीर विषयावर चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे ही काळाची गरज आहे. तसेच देशात 'वन नेशन वन इलेक्शन' धोरण लागू होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे देशात 'सेक्युलर सिविल कोड' (धर्मनिरपेक्ष नागरी संहिता) लागू करण्याची गरज आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले.


आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी कुठे म्हणाले की जे कायदे धर्माच्या आधारावर देशाचे विभागणी करतात, ते उच्चनीचेतेचे कारण बनतात. अशा कायदा आधुनिक समाजात कोणतेही स्थान नाही. आणि याचसाठी एक सेक्युलर सिविल कोड असण्याची गरज आहे. आपण कॉमन सिविल कोडमध्ये 75 वर्षे घालवले आहेत, आता आपल्याला सेक्युलर सिविल कोड स्वीकारणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन करून पंतप्रधान पुढे म्हणाले की देशात धर्माच्या आधारावर जो भेदभाव केला जातो आहे, सामान्य नागरिकांना जोडावा जाणवतो आहे, त्यापासून आपल्याला निश्चित मुक्ती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भाषणात माझ्या पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की देशातील नागरिकांसाठी आम्ही दीड हजारांपेक्षा जास्त कायदे रद्द केले. ज्यामुळे लोकांचे जीवन आता अधिक सुसह्य होणार आहे. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले की आमच्या 'इज ऑफ लिविंग मिशन'मध्ये सहभागी व्हावे. असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, 2047 पर्यंत आपल्याला भारत देश एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी शिफारसी मागवल्या आहेत. काही लोकांनी भारताला कौशल्य राजधानी बनवण्याची सूचना केली आहे तर काहींनी देश आत्मनिर्भर व्हावा यावर भर दिला आहे. शासन आणि न्यायप्रणालीत सुधारणा, शहराचे निर्माण करणे, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन उभे करणे, याबाबत अनेक जाणकार, महनीय व्यक्तींनी सूचना केल्या आहेत, असे हे नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

आपण मिशन मोडवर इज ऑफ लिविंग साठी काम केलं आहे. मी प्राध्यापक व युवकांना आवाहन करतो की तुम्हाला ज्या काही लहान मोठ्या अडचणी असतील तर सरकारला जरूर कळवा देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा केंद्र सरकार तुमच्या पत्राची नक्कीच दखल घेतील.

बांगलादेशात जे काही घडले आहे ते पाहून शेजारी देश म्हणून दुःखी होण स्वाभाविक आहे, मात्र बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू धर्मीयांचे संरक्षण व्हावे अशी भारतीयांची बांगलादेशांकडून अपेक्षा आहे.

घराणेशाही आणि जातीयवादाच्या राजकारणामुळे देशाच्या लोकशाहीलाच धोका निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसणारे, किमान एक लाख लोक पुढे आणणे गरजेचे आहे.

नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखी व्यवस्था तयार केली आहे. यासाठी एक कोटी रुपये रिसर्च अँड इनोव्हेशनसाठी दिले आहेत. 

दहा वर्षाच्या काळात मेडिकल जागांची संख्या 1 लाखाहून अधिक झाली आहे. आगामी पाच वर्षाच्या काळात यामध्ये आणखी 75 हजार नवीन जागांची निर्मिती केली जाईल.

कोणत्याही परिस्थितीत आमचे भ्रष्टाचार विरोधी लढाई सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे, मग ती व्यक्ती कितीही मोठी असो.

78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करण्यात आलेल्या भाषणासाठी देश विदेशातील अनेक महनीय पाहुणे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अनेक राजकारणी, उद्योगपती, तसेच ऑलम्पिक मध्ये सहभागी झालेले खेळाडू, त्याचप्रमाणे देश विदेशातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष व अरुण राहिले होते. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर, नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच स्वातंत्र्य दिनानिमित्तचे भाषण होते. भारताचे प्रथम पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू, प्रथम महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त, सर्वाधिक वेळा संबोधित करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव कोरले गेले आहे.