yuva MAharashtra 77 वर्षांपूर्वी रक्ताच्या पाटाने फाळणीची सीमारेषा आखली गेली, लाहोरही गेलं !

77 वर्षांपूर्वी रक्ताच्या पाटाने फाळणीची सीमारेषा आखली गेली, लाहोरही गेलं !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १८ ऑगस्ट २०२४
आजपासून बरोबर 78 वर्षांपूर्वीच म्हणजेच 17 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळून दोन दिवस उलटून गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणीवर शिक्कामोर्तब करणारी सीमारेषा आखली गेली. परंतु ही सीमारेषा आखण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले. ती भळभळणारी भावनिक जखम आजही ठसठसते आहे. दहशतवादाच्या माध्यमातून ती अजूनही भरू दिली जात नाही. आजही निष्पाप जीवांना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागते आहेत.

17 ऑगस्टला दुपारी बंगाल आणि पंजाब सीमा विभाजन आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांनी सीमा म्हणजेच विभाजन रेषा जाहीर केली. फाळणीच्या काळात अमृतसर, फिरोजपूर आणि गुरुदासपूरवर पाकिस्तानचा दावा मजबूत होता, पण लॉर्ड माउंटबॅटन यांच्या एका स्नेहभोजनाने परिस्थिती बदलली. दुसरीकडे, शीखबहुल लाहोर जवळजवळ भारताचे होते, परंतु रॅडक्लिफ यांच्या एका कल्पनेने ते पाकिस्तानच्या झोळीत टाकले.

कधीही भारतात न आलेल्या रॅडक्लिफ यांनी भारताचे दोन भाग कसे केले ?

हिंदुस्थानचे शेवटचे शेवटचे व्हाईसराॅय लाॅर्ड माउंटबॅटन यांनी सीमा विभाजनसाठी अशी व्यक्ती निवडली जी कधीही भारतात आली नाही. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना भारत आणि पाकिस्तानची फाळणी करावी लागली. त्यांच्यासमोर समस्या होती की सीमा कोण काढणार ? माउंटबॅटन यांनी अनेक लोकांच्या नावावर विचारमंथन केले, परंतु त्यांनी सर सिरिल रॅडक्लिफ यांची निवड केली. रॅडक्लिफ हे त्यावेळी इंग्लंडमधील सर्वोत्तम न्यायाधीशांपैकी एक होते. मात्र असे काम त्यांनी यापूर्वी कधीच केले नव्हते. कोणत्याही देशाच्या सीमांचे विभाजन करण्याचा विचारही त्यांनी केला नव्हता. जेव्हा काही लोकांनी असा आरोप केला की ज्या माणसाने भारताची फाळणीही पाहिली नाही तो कसा करणार ? तेव्हा ब्रिटीश सरकारने उत्तर दिले की हे वाईट नाही तर चांगले आहे, जो कधीही भारतात आला नाही तो न्याय्यपणे आणि भेदभाव न करता वाटप करेल. परंतु जी सीमा रेषा आखली गेली त्यामुळे आजही वादाची रेषा मात्र मिटली गेली नाही... ती आजही अधिकच गडद होत चालली आहे.