Sangli Samachar

The Janshakti News

केंद्राचे महाराष्ट्राला मोठे 'गिफ्ट' तब्बल 7,105 कोटी रुपये खर्चून थेट मुंबई-दिल्लीशी मराठवाड्याची नाळ जोडणार !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० ऑगस्ट २०२४
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधकांकडून विरोधकांकडून होत असतानाच मोदी सरकारने महाराष्ट्राला एक मोठे गिफ्ट दिलं असून, त्यानुसार जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. 174 किमी रेल्वे मार्गासाठी तब्बल सात हजार 105 कोटी रुपये केंद्राने मंजूर केले असून, त्यामुळे आता मराठवाड्यातील व्यापाराबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.  

युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे राजुर गणपती हे गणेश भक्तांसाठी मोठे प्रसिद्ध ठिकाण आहे परंतु या ठिकाणी जाण्यासाठी केवळ हवाई आणि रस्ता मार्गच उपलब्ध आहे. परंतु आता या निर्णयामुळे ही दोन्ही महत्त्वाचे ठिकाणे रेल्वे मार्गाने थेट मुंबई दिल्लीशी जोडले जाणार असल्याने ही पर्यटक आणि भाविकांसाठी मोठी भेट असल्याचे मानले जात आहे.


24 हजार 657 हजार कोटींचे प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 8 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी 24 हजार 657 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आल्याचे ते म्हणाले.या प्रकल्पात आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रमाणात प्रकल्प देण्यात आले आहेत.ओडिसात तीन मोठे प्रकल्प देण्यात आले आहेत.झारखंड आणि बिहारला जोडणारा गंगा नदीवर ब्रीज लाईन टाकली जाणार आहे. हा प्रकल्प 26 किमीचा असेल, असेही त्यांनी सांगितले.

कोणाला होणार फायदा ?

मराठवाड्यामध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखली जाणारी अजिंठा लेणी आहे. तसेच तीर्थक्षेत्र असलेले राजूर गणपती हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येता. या नव्या रेल्वे मार्गामुळे ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्ग झाल्यास याचा फायदा मराठवाडा आणि खान्देश भागातील स्थानिकांना उद्योजकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना होणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा आहे.