yuva MAharashtra यंदाचा श्रावण आहे खास, तब्बल 71 वर्षांनी आलेला हा योग शिवभक्तांसाठी ठरणार पर्वणी !

यंदाचा श्रावण आहे खास, तब्बल 71 वर्षांनी आलेला हा योग शिवभक्तांसाठी ठरणार पर्वणी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ ऑगस्ट २०२४
श्रावण महिना म्हटला की तो शिवभक्तांसाठी खास... प्रत्येक श्रावण सोमवार म्हणजे ते आणि शक्तीचा आजोड संगम. देशभरातील सर्वच महादेव मंदिरात या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान असलेल्या बारा ज्योतिर्लिंग शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाची असल्याने या ठिकाणी भाविकांचे मोठी मांडीयाळी असते. यासाठी खास सहलींचे आयोजन ही करण्यात येते.

यंदाचा श्रावण उद्या म्हणजे दहा ऑगस्ट रोजी सुरू होणार असून त्याची समाप्ती ही सोमवारीच म्हणजे आठ सप्टेंबर रोजी होणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर पाच सोमवारचा हा अनोखा योग जुळून आला आहे. 2006 मध्ये श्रावणात पाच सोमवार आले होते तर 1953 मध्ये सोमवारी श्रावण महिन्याची सुरुवात होऊन समाप्तीही सोमवारीच झाली होती.


बारा ज्योतिर्लिंगपैकी तब्बल पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये १. परळी वैजनाथ - बीड. २. भीमाशंकर- पुणे. ३. त्र्यंबकेश्वर- नाशिक. ४. घृष्णेश्वर-वेरुळ, छत्रपती संभाजी नगर. ५. औंढा नागनाथ- हिंगोली. या ठिकाणी असलेले ज्योतिर्लिंग धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जातात.

या पार्श्वभूमीवर शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सांगली जवळच्या हरिपूर मधील संगमेश्वर मंदिर हे अति प्राचीन असून येथे हे भाविकांची मोठी गर्दी दर सोमवारी होत असते. याशिवाय सांगली शहरातील अनेक महादेव मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.