| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते व माजी नगराध्यक्ष स्व. पै. ज्योतीराम दादा सावर्डेकर यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या, सांगलीचे वैभव ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वास पुतळ्यास 62 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सावर्डे कर कुटुंबीयामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र म्हटला. यावेळी स्व. पै. ज्योतीराम दादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने प्रसाराचेही वाटप करण्यात आले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनीही छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी स्व. पै. ज्योतीराम दादा सावर्डेकर यांचे नातू. संभाजी तात्या सावर्डेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पै. संभाजी तात्या सावर्डेकर, विक्रम दादा सावर्डेकर, शिवराज सावर्डेकर, अभिजीत सावर्डेकर, विराज बुटाले यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
वास्तविक छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास 62 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी महापालिकेच्या व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोठ्या समारंभाचे नियोजन करण्याची गरज होती. पण यावेळी ना कोणी हिंदुत्ववादी संघटनेचा पदाधिकारी, ना महापालिकेचा कोणी पदाधिकारी अथवा नगरसेवक फिरकलेही नाहीत. याबद्दल शिवभक्तांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.