yuva MAharashtra सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, कोयनेतून ज्यादा विसर्ग; तरीही कृष्णेची पाणी पातळी 42 फुटांपर्यंतच वाढण्याची शक्यता !

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, कोयनेतून ज्यादा विसर्ग; तरीही कृष्णेची पाणी पातळी 42 फुटांपर्यंतच वाढण्याची शक्यता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने आणि कोयना धरणातून पन्नास हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने, कृष्णा काठ धास्तावला आहे. मात्र असे असले तरी कृष्णा नदीचे पाणी पातळी दोन किंवा तीन फुटापर्यंतच वाढणार असल्याने, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी मात्र घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

गेल्या बारा तासात सांगली येथील आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 39. 9 इतकेच स्थिर आहे. त्यामुळे वरून येणाऱ्या जादाचे पाणी 42 किंवा फार तर 43 फुटापर्यंत वाढणार असल्याची शक्यता, पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. आगामी 24 तास महत्त्वाचे असून, पिवळ्या पूरपट्ट्यातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. विस्थापित नागरिकांची सर्व सोय, गणेश नगर येथील रोटरी हॉल तसेच अन्य ठिकाणी केली आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, तसेच आरोग्याची ही काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता, किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी करावी, असे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी म्हटले आहे. 


सध्या मगरमच्छ कॉलनी क्रमांक एक व दोन तसेच नांद्रे रोडवरील काही भागात पाणी शिरले असून तेथील दोन हजारावरील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. उर्वरित नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. दरम्यान पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, मदन भाऊ युवा मंच, भाजपाची कोअर टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज असून, विस्थापितांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे.

दिनांक - 3 ऑगस्ट, 2024 वेळ - 
सकाळी 06.00 वाजता पूर पाणी पातळी

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 39 फुट 10 इंच

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट

🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी 52 फुट 7 इंच

🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट

📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष  
7066040330 / 
7066040331 / 
7066040332
                     
मदत व बचावकार्य कक्ष                                                                                           
🚒 अग्निशमन दल 🚒 
टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज - 0233-2222610