Sangli Samachar

The Janshakti News

एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती निमित्त, 30 ऑगस्टला जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली असून, या महामंडळाचे एक लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपुर्ती झाल्या निमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने, 30 ऑगस्ट 2024 रोजी इंदिरा पॅलेस हॉल, पेठ नाका, इस्लामपूर येथे जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा आयोजित केल्याची माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी दिली. 


सदर महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आजपर्यंत 1,2,890 लाभार्थी झाले असून, त्यांना 8,883 कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने 837 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. तर सांगली जिल्ह्यात आजपर्यंत 6, 296 लाभार्थी झाले असून, त्यांना 581 कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने 55 कोटी रुपये पेक्षा जास्त व्याज परतावा केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदय यांच्याबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत तसेच खाजगी व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी तसेच अन्य संबंधित आणि दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.