| सांगली समाचार वृत्त |
बेळगाव - दि. १ ऑगस्ट २०२४
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणातील आणि नदीपात्रातील पाणी वेगाने वाढते आहे. अनेक ठिकाणी ते नागरी वस्तीमध्ये शिरले असून नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. शेतीचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण निसर्गावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने अलमट्टी धरण प्रशासन व कर्नाटक शासनावर टीका करीत, जाहीर केल्याप्रमाणे अलमट्टी प्रशासन व कर्नाटक शासन धरणातून अपेक्षित विसर्ग करीत नसल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी आज अलमट्टी धरणाची तेथील अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली, तसेच अलमट्टीखालील 60 किलोमीटर अंतरावरील नारायणपूर धरणाचा ही पाहणी दौरा केला. तेथील धरणाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. सध्याच्या पूर पाहता, अलमट्टीतील विसर्ग आणि शिरोळ तालुक्यातील उद्भवणारी परिस्थिती याबाबत संवाद साधला.
यावेळी पाटोळे यांच्याशी बोलताना अलमट्टी धरणाचे अधिकच अभियंता हिरेगौडर आणि नूडल अधिकारी व्ही डी कुलकर्णी यांनी मट्टी धरणातून सध्या सुरू असलेला तीन लाख 50 हजार क्युसेस पाणी विसर्ग आम्ही कायम ठेवू अशी ग्वाही दिली. आवश्यकतेनुसार प्रसंगी त्यात वाढ ही करू असे हे हिरेगौडर यांनी म्हटले आहे. त्यांच्यासह नोडल अधिकारी व्ही डी कुलकर्णी, सहाय्यक अभियंता कुमार हंचीनाळ यांनी सध्याची अलमट्टी धरणातील पाण्याची आवक, आवक आणि विसर्ग याबद्दलचे गेल्या पंधरा दिवसातील आकडेवारी सादर केली. धरणाची व्यवस्थापन यंत्रणा कृत संगणीकृत असून त्याद्वारे प्रत्येक तासाला आढावा घेऊन विसर्ग बाबत निर्णय घेतला जात असल्याचे हिरेगौडर यांनी सांगितले.
अलमट्टीच्या मागील बाजूस हिप्परगी बॅरेज आणि तिथून पुन्हा महाराष्ट्राच्या राजापूर बंधाऱ्यापर्यंतच्या सिंचन योजनांची माहिती पाटोळे यांना देण्यात आली. या संपूर्ण 200 किलोमीटरच्या नदीपात्रातून कॅनॉल खोदून नैसर्गिक उताराने कर्नाटकने राबवलेल्या सिंचन योजनांची ही माहिती यावेळी देण्यात आली. . सध्या संपूर्ण विजापूर तालुक्यात पाऊस नाही. याच काळात या सर्व योजनांना पूर्ण क्षमतेने सुरू करून पाणी देण्यात येते. सध्या अलमट्टी धरणाच्या मागील बाजूस असलेले बॅक वॉटर नैसर्गिक उताराने जात असून महाराष्ट्रातून होणाऱ्या विसर्गनुसार अलमट्टी धरणातील विसर्ग बाबत स्काडा प्रणालीच्या आधारे नियंत्रण केले जात असल्याचे अलमट्टी धरण प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले.