Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, नदीकाठच्या गावांना पुन्हा सावधगिरीचा इशारा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑगस्ट २०२४
सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरात गत महिन्यात झालेल्या कोसळधार पावसामुळे नदीकाठचा नागरिक भयभीत झाला होता. सांगली शहरांमध्ये महापुराच्या पाण्याने कृष्णामाई इशारा पातळीला शिवून पुन्हा माघारी परतली. त्यामुळे 2019 च्या महापुराची पुनारावृत्ती टळली. मात्र कोल्हापूर शहरातील काही भागात पंचगंगेने हैदोस घातला.

या भागातील नागरिक आत्ता कुठे थोडासा उसंत घेत असतानाच, हवामान खात्याने महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या 22 जिल्ह्यांमध्ये सातारा व सांगली जिल्ह्याचा समावेश असल्याने, नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा एकदा आपला बाळ दिसणारा हलवावा लागतो की काय ? अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र आता ती शक्यता जवळपास नसल्याची तज्ञांची माहिती आहे.


दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा घेण्यात आला आहे. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.