yuva MAharashtra सांगली येथील प्रतिथयश कर्मवीर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना 15 टक्के लाभांश देणार - रावसाहेब पाटील

सांगली येथील प्रतिथयश कर्मवीर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न, सभासदांना 15 टक्के लाभांश देणार - रावसाहेब पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
सांगलीच्या सहकार क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या कर्मवीर पतसंस्थेची 37 वी वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली. 2023 24 साठी सभासदांना 15% ने लाभास देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जनगोंडा पाटील यांनी केली यावेळी या घोषणेचे सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

सभेची सुरुवात संस्थेचे श्रद्धास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व.डॉ. आप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉ. अशोक अण्णा सकळे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. यावेळी दिवंगताना दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहण्यात आली.


उपस्थित सभासदांचे स्वागत करून, सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले, संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदवलेले आहे. याचे श्रेय सभासद, संचालक, सेवक यांच्या सांघिक कार्यास द्यावे लागेल. संस्थेला 2024 चा दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याचे सांगताच, सभासदांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. 

आपल्या मनोगतात श्री. रावसाहेब पाटील म्हणाले की, संस्थेची प्रगती उल्लेखनीय असून, ज्यादा तरतुदीमुळे संस्थेचा ताळेबंद मजबूत झाला आहे. यावेळी त्यांनी संपत्तीक स्थितीचे विवेचन केले. संस्था सभासद उन्नतीच्या योजना राबवत असल्याचे सांगून श्री. रावसाहेब पाटील म्हणाले की, सभासदाच्या उन्नतीच्या योजना संस्था राबवत आहे, त्यातूनच त्यांची आर्थिक प्रगती होत असल्याचा आनंद आपल्याला आहे. सभासदांनी संस्थेच्या कार्यास पाठबळ देण्याचे आवाहन श्री रावसाहेब पाटील यांनी यावेळी केले.


सभासदांना लाभांशाच्या रूपाने (15 %) चार कोटी 66 लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेविंग खात्यास वर्ग होऊन, सभा सुरू असतानाच यासंबंधीचा मेसेज सभासदांना प्राप्त झाला. . याबद्दल सभासदांनी संस्थेच्या सेवेचे मुक्तकंठाने कौतुक केले. 
सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले. मगदूम यांनी संस्थेची संपत्तीची स्थिती सविस्तर विशद केले संस्थेच्या वाढीची आकडेवारी सह माहिती त्यांनी सभासदांपुढे प्रस्तुत केली. सर्वच बाबतीत संस्थेने 25% हून अधिक वाढीचा रेशो साध्य केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सभासदांनी नवीन शाखा विस्तारासह संस्थेच्या अंदाजपत्रकासही एकमताने मंजुरी दिली.

अहवाल सालात संस्थेला 13 कोटी 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, त्याच्या विभागणीस सभासदांनी मंजुरी दिली. मार्च अखेर संस्थेच्या ठेवी 1090 कोटी 69 लाख आहेत. कर्ज वाटप 811 कोटी 13 लाख रुपये आहे. वसूल भाग भांडवल 34 कोटी 85 लाख रुपये आहे. तर गुंतवणूक 370 कोटी 73 लाख रुपये आहे. एकूण स्वनिधी 106 कोटी 29 लाख रुपये आहे. सभासद संख्या 63938 इतकी असून 63 शाखातून संस्था कार्यरत आहे.

यावेळी सीए बी. डी. वांगीकर, सुदर्शन कदम, प्रकाश पाटील, सुनील फराटे, रमेश चोपडे, विनोद पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी विविध सभासदाने संस्थेचे चेअरमन रावसाहेब जनगोंडा पाटील यांचा सत्कार केला.

सभेस व्हाईस चेअरमन डॉ. अशोक यांना सकळे, ॲड. एस पी मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के चौगुले (नाना), डॉ. एस बी पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालका श्रीमती भारतीयम आप्पासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे, श्री. बजरंग भाऊसो माळी, श्री आप्पासो दादू गवळी, श्री अमोल विनायक रोकडे आदिसह संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी संचालक श्री. वसंतराव धुळपणा नवले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संजय सासणे यांनी केले होते.