Sangli Samachar

The Janshakti News

हिंडेनबर्गचा दणका, सेकंदात अदानी समूहाचे 1.28 लाख कोटी पाण्यात गेले !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गचा अहवाल अदानी समूहासाठी 'कर्दनकाळ' ठरला. आठवड्याच्या शेवटी हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालानंतर शेअर बाजारात मोठे कांड घडले असे म्हणायला हरकत नाही. कारण अदानी समूहाचे शेअर पत्त्याच्या चांगल्या प्रमाणे कोसळले होते. एका माहितीनुसार सुरुवातीच्या सत्रातच ते 17 टक्के पर्यंत घसरले. मागील वर्षीही हिंडेनबर्गचा अदानी ग्रुपला मोठा फटका सहन करावा लागला होता. आणि यंदा त्याची पुनरावृत्ती घडली. त्यामुळे उद्योग समूहात मोठी खळबळ माजली आहे.

सकाळी 9.15 वाजता बाजार उघडताच अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले. अदानी एनर्जी सोल्युशन्सने बीएसईवर सुमारे 17 टक्क्यांच्या घसरणीसह सुरुवात केली. सकाळी 9.30 वाजता बीएसईवर हा शेअर 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 1,075.45 रुपयांवर व्यवहार करत होता.

अदानीचे सर्व शेअर्स लाल रंगात

सकाळी 9.30 वाजता अदानी टोटल गॅसला सर्वाधिक 1.5 टक्के तोटा सहन करावा लागला. अदानी पॉवर आणि अदानी विल्मार यांचे शेअर्स प्रत्येकी 3 टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरला होता. त्याचप्रमाणे अदानी ग्रीन एनर्जी जवळपास अडीच टक्क्यांनी घसरला होता.


यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये जेव्हा हिंडेनबर्गने अदानी समूहाला प्रथमच लक्ष्य केले होते, तेव्हा अदानी समूहाच्या शेअर्सना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

अहवाल आल्यानंतर जवळपास महिनाभर अदानी समूहाचे शेअर्स घसरत राहिले आणि सतत लोअर सर्किटला बळी पडत होते. त्यावेळी अदानी समूहाचे शेअर्स 80 टक्क्यांहून अधिक घसरले होते आणि मार्केट कॅपला 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले होते.

अदानी समूहाचे 1.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आज शेअर बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच अदानी समूहाचे 1.28 लाख कोटी रुपये बुडाले. अदानीच्या बहुतांश शेअर्समध्ये 4 ते 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे समूहाचे मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे.