| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ जुलै २०२४
दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीए पेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल, तसेच अन्नपदार्थातील भेसळखोरांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही रमणी पॅटर्न राबवणे तसेच राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ विषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
राज्यातील दुधांमधील भेसळखोरा विरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथी ग्राहक पार पडलेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अन्नपदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. आपल्या भावी पिढीचे हे नुकसान होणार आहे. यामुळे अनेकांना कर्करोगांसारखा दुर्धर आजार अनेकांना जडतो. त्यामुळे भेसळ कोरांवर एमपीडीए पेक्षाही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्नपदार्थातील भेसळ व दूध तसेच दुग्धजन्य पदार्थातील पेशवे करतात केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.