Sangli Samachar

The Janshakti News

मित्रासाठी काही पण, कुठे पण... थेट कारागृहातच फोडले बॉम्ब !


| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - दि. ८ जुलै २०२४
'मित्रासाठी काय पण कधी पण कुठे पण' असे म्हटले जाते. मैत्रीसाठी कधी कधी जीवावर हे उदार झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यावर अनेक कथा कादंबऱ्या रंगल्या आहेत, चित्रपट ही निघाले आहेत. मित्राच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवारीने केक कापण्याच्या घटना आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. पण वाढदिवसानिमित्त थेट कारागृहात जाऊन बॉम्ब सदृश्य वस्तू फोडण्याचा हा पहिलाच प्रकार असावा.

याबाबत अधिक माहिती अशी की अमरावती जिल्हा कारागृहात शनिवारी रात्री बॉम्ब सदृश्य वस्तू फेकण्याच्या घटनेमुळे संपूर्ण कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर अमरावतीचे सीपीडीसीपी आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला. 


रात्री अचानक कारागृहात स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या परिसरातही खळबळ उडाली. हा प्रकार सहा आणि सात क्रमांकाच्या बॅरेकसमोर घडला असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. आणि या मागचे कारण ऐकून पोलिसांकडून आश्चर्यचकित झाले. कारागृहात बंद असणाऱ्या एका कैद्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी चक्क बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट घडवून आनंद साजरा केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली.

अमरावती कारागराच्या मागून जाणाऱ्या अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवरून हे बॉम्ब फोडून कायद्याच्या मित्रांनी हा आनंदोत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता, या प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासातच अटक केली. हर्ष शेरेकर आणि रोहित काळे असे अटक केलेल्या दोघांची नावे असून दोघेही अमरावती शहरातील बेनोडा परिसरातील रहिवासी आहेत.


परंतु या प्रकारामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्याच्या कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापूर्वी कारागृहातील कैद्यांना मोबाईल, अमली पदार्थ, मिष्टान्न आणि अशाच प्रकारच्या वस्तू देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. परंतु त्यामुळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कायद्यांच्या जीवावर बेतू शकते, किंवा अन्य एखादा गंभीर गुन्हा नव्याने घडू शकतो. त्यासाठी आता राज्य व केंद्र शासनाने खडक धोरण अवलंबण्याची गरज व्यक्त होत आहे.