yuva MAharashtra पंढरपूर येथे आषाढी यात्रे करिता विशेष गाड्या धावणार !

पंढरपूर येथे आषाढी यात्रे करिता विशेष गाड्या धावणार !


| सांगली समाचार वृत्त |
सोलापूर - दि. ५ जुलै २०२४
पंढरपुर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक / श्रद्धाळू पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरीता येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गंतव्य थांब्यामध्ये विस्तार करण्यात आला आहे. त्या गाड्या खालील प्रमाणे आहेत.

गाडी क्र. 01205 नागपूर-मिरज

विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 14.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 15.07.2024 रोजी सकाळी 11.55 वा पोहोचेल. 
 
गाडी क्र. 01206 मिरज -नागपूर

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 18.07.2024 ला मिरज इथून दुपारी 12.55 वा सुटेल. आणि नागपूर स्थानकावर दि.19.07.2024 रोजी दुपारी 12.25 वा पोहोचेल. 

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड ,ढालगाव ,कवठेमहाकाळ ,सलगरे , आरग ,मिरज.
संरचना: 08 स्लिपर +07 जनरल +1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकुण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या


गाडी क्र. 01207 नागपूर-मिरज

विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 15.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 16.07.2024 रोजी सकाळी 11.55 वा पोहोचेल. 
 
गाडी क्र. 01208 मिरज -नागपूर

विशेष गाडी यात्रा मिरज इथून प्रारंभ दि. 19.07.2024 ला दुपारी 12.55 वा सुटेल. आणि नागपूर स्थानकावर दि.20.07.2024 रोजी दुपारी 12.25 वा पोहोचेल. 
 
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड , ढालगाव ,कवठे महांकाळ, सलगरे, आरग ,मिरज.
संरचना: 14 स्लिपर +2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या



गाडी क्र. 01119 न्यू अमरावती – पंढरपूर

विशेष गाडी न्यू अमरावती इथून यात्रा प्रारंभ दि. 13.07.2024 आणि 16.07.2024 ला दुपारी 02.40 ला सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर 14.07.2024 आणि 17.07.2024 सकाळी 09.10 वा पोहोचेल. 

गाडी क्र. 01120 पंढरपूर - न्यू अमरावती

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 14.07.2024 आणि 17.07.2024 ला पंढरपूर इथून संध्याकाळी 07.30 वा सुटेल. आणि न्यू अमरावती येथे दि. 15.07.2024 आणि 18.07.2024 ला दुपारी 12.40 वा पोहोचेल . 

थांबे: बडनेरा , मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा ,मलकापूर,बोदवड , भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,पंढरपूर. 
संरचना: 07 स्लिपर +07 जनरल + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत 02 एसएलआर= एकुण 18 कोचेस 
एकूण 02+02= 4 फेऱ्या. 


गाडी क्र.01121 खामगाव –पंढरपूर

विशेष गाडी खामगाव इथून यात्रा प्रारंभ दि.14.07.2024 आणि 17.07.2024 ला सकाळी 11.30 वा. ला सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वाजता पोहोचेल . 

गाडी क्र.01122 पंढरपूर -खामगाव

विशेष गाडी पंढरपूर इथून यात्रा प्रारंभ दि.15.07.2024 आणि 18.07.2024 ला पहाटे 5 वा. सुटेल आणि खामगाव स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल . 

थांबे: जलंब, नांदुरा ,मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी आणि पंढरपूर. 
संरचना: 07 स्लिपर +07 जनरल+ 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस. 
एकूण 02+02= 4 फेऱ्या. 

गाडी क्र. 01159 भुसावळ- पंढरपूर

विशेष गाडी भुसावळ येथून यात्रा प्रारंभ दि. 16.07.2024 ला दुपारी 01.30 वा. सुटेल आणि पंढरपूर येथे 17.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वा पोहोचेल. 

गाडी क्र. 01160 पंढरपूर-भुसावळ

विशेष गाडी पंढरपूर येथून यात्रा प्रारंभ दि. 17.07.2024 ला रात्री 10.30 वा सुटेल.आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.00 वा भुसावळ येथे पोहोचेल . 

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई ,कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी. 
संरचना: : 05 स्लिपर +11 जनरल+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस.

गाडी क्र.01101 लातूर-पंढरपूर-लातूर

विशेष गाडी लातूर स्थानकावरून यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024आणि 19.07.2024 रोजी सकाळी 7.30 वा सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी दुपारी 12.30 वा पोहोचेल .

गाडी क्र.01102 पंढरपूर -लातूर-पंढरपूर

विशेष गाडी पंढरपूर स्थानकावरून यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024आणि 19.07.2024 रोजी दुपारी 01.50 वा सुटेल आणि लातूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी रात्री 07.20 वा पोहोचेल .
 
थांबे :हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री,कुर्डूवाडी, मोडनिंब. 
संरचना: 08 स्लिपर+ 04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14.
एकूण 05+05=08 फेऱ्या.

गाडी क्र.01107/01108 मिरज-पंढरपूर-मिरज

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यन्त धावेल.
- मिरज इथून पहाटे 05.00 वा. सुटेल तर पंढरपूरला सकाळी 07.40 वा पोहोचेल.
- पंढरपूर इथून सकाळी 09.30 वा. सुटेल तर मिरजला दुपारी 01.50 वा पोहोचेल.
  
थांबे :अरग, बेलंकी, सलगरे,कवठेमहांकाळ, लंगरपेट, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव,जवळा, वासुद, सांगोला. 
संरचना: 12 डब्यांची मेमू . 
एकूण 10+10=20 फेऱ्या.

गाडी क्र.01209 /01210 मिरज- कुर्डूवाडी -मिरज

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यन्त धावेल.
- मिरज इथून दुपारी 03.10 वा. सुटेल तर कुर्डूवाडी येथे सायंकाळी 07.00 वा पोहोचेल. 
-कुर्डुवाडी येथून रात्री 09.25 वा सुटेल आणि मध्यरात्री 01.00 वा मिरज येथे पोहोचेल. 

थांबे : आरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ , लंगरपेट, ढालगाव,जत रोड , म्हसोबा डोंगरगाव, जवळा ,वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब. 

संरचना: 12 डब्यांची मेमू 

एकूण 10+10=20 फेऱ्या. 

तरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक आणि श्रद्धाळू यांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.