yuva MAharashtra जनतेतून विधानसभेत जाण्यासाठी जयश्रीताईंनी पदर खोचला, बैठकांचे सत्र सुरू ?

जनतेतून विधानसभेत जाण्यासाठी जयश्रीताईंनी पदर खोचला, बैठकांचे सत्र सुरू ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जुलै २०२४
सांगली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीवाडी परिसरातील नागरिकांना, मतदारांना भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील या सांगलीवाडी मध्ये आल्या होत्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. लोकसभेला जसे आपण विशाल दादांच्या मागे उभे राहिलात तसे येणाऱ्या निवडणुकीत माझ्याही मागे उभे राहावे असे आवाहन यावेळी जयश्रीताईंनी केले. संपूर्ण सांगली वाडी परिसरात जयश्रीताईंच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या ही मांडल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन जयश्री त्यांनी दिले आहे.


यावेळी विजय आबा पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, मदन भाऊ पाटील विवाह मंचचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महाबळेश्वर चौगुले, शशिकांत पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, आबा फडतरे, उदय पाटील, आनंदा जामदार, विशाल यादव, योगेश पाटील, सुरेश कोरे, अंकुश साळुंखे, रवींद्र कोळी आदी प्रमुख पदाधिकारी व सांगली वाडीतील महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.