yuva MAharashtra अशोका ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसला सांगलीत अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही !

अशोका ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसला सांगलीत अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जुलै २०२४
काल रात्री अकराच्या सुमारास मिरजेहून सांगलीकडे येणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसला अपघात होऊन यामध्ये तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, बसचे मात्र किरकोळ नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेहून सांगलीकडे येणारी अशोका ट्रॅव्हल्सची स्लीपर बस जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आली असताना, एका वटवाघळाने बस ड्रायव्हरवर अचानक हल्ला केल्याने, ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याकडे असलेल्या झाडावर आदळली. 


अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी अपघात धाव घेतली. उपस्थितांपैकी काहींनी या अपघाताची माहिती विश्रामबाग पोलीस स्टेशनला कळवली. पोलीस आणि तात्काळ घटनास्थळी गाव घेत, परिसराचा ताबा घेतला, व बघ्यांची गर्दी हटवली. यावेळी अग्निशमन दलाचा एक भव्य हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. याच ठिकाणी दोन-तीन वर्षांपूर्वी एका कारचा एक्सीडेंट होऊन तिघांना प्राण गमवावा लागला होता. या घटनेची आठवण उपस्थितांपैकी काहींनी करून दिली.