Sangli Samachar

The Janshakti News

सांगली, मिरजेतील ई-बसेसचं घोडं अडकलं महावितरणच्या दारात !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ जुलै २०२४
इंधनाची बचत तसेच पर्यावरणाचा समतोल या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 2023 मध्ये बसेस वापरण्याची घोषणा केली. यानंतर मुंबई पुणे, नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये या बसेसची सेवा सुरू ही झाली. 

'शिवाई बस सेवा' नावाने सुरू झालेल्या या योजनेतील ही बस आरामदायी, आवाज न करणारी असल्याने प्रवाशांनी याला पसंतीही दिली. कमी पैशात एसीचा प्रवास. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात येऊ लागल्या.

सांगलीसाठीही 120 ई बसेस देण्याची घोषणा झाली त्यामध्ये सांगलीला 40 कुर्ला 40 आणि मिरजेसाठी 40 असा गाड्यांची विभागणी ठरवण्यात आली. या ईबसेसच्या चार्जिंग साठी राज्य वीज महामंडळाकडून 11/22/33 के व्ही क्षमतेची उच्च दाबाची वीज जोडणी गरजेचे होती. त्यानुसार इस्लामपूर बस डेपो मधील चार्जिंग स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. लवकरच ते पूर्ण होऊन इस्लामपूर बस ठाण्याच्या ई बसेस रस्त्यावर धावण्यास सुरुवात होईल.


मात्र इस्लामपूरच्या तुलनेत सांगली आणि मिरजेत मात्र ई बसेस हे सध्या स्वप्नवतच ठरत आहे. कारण चार्जिंग स्टेशनचे घोडे महावितरण आणि महामंडळाच्या कारभारात अडकले आहे. अधिकाऱ्यांच्या मते सांगलीसाठी माधवनगर येथे आणि मिरजेतील चार्जिंग स्टेशन साठी जागा निश्चित करण्यात आली. याबाबत कागदोपत्री पूर्तता करण्यात आले तसे वरिष्ठांना कळविण्यातही आले. पण सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीनुसार सांगली मिरजेतील काम रखने आहे.

एसटी महामंडळाने वीज जोडणीसाठी चार्जिंग स्टेशन बाबत महावितरण कडे पत्र पाठवले मात्र त्यांच्याकडून सर्व स्टेशनसाठी बारा गुंठे जागेची मागणी करण्यात आली त्याचबरोबर जागा नसेल तर अधिकचे डिपॉझिट भरावे लागेल असे सांगण्यात आले जे कोट्यावधी रुपयांमध्ये होते त्यामुळे महावितरणाने महामंडळ यांच्या वादात चार्जिंग स्टेशन रखडण्याची माहिती पुढे येत आहे चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने आणि ती कधी उपलब्ध होईल याची निश्चिती नसल्याने ही ई बस भ्रमाचा भोपळा ठरत आहे.

याबाबत माहिती देताना महावितरण अधिकारी गोविंद वर्पे म्हणाले की महावितरण कडून माधवनगर आणि मिरज येथे महामंडळाच्या जागेत सबस्टेशन उभारण्यासाठी 12 गुंठेची मागणी करण्यात आली होती त्यानुसार बारा गुंठे जागा आणि अनामत रक्कम भरली की कनेक्शन देणार आहोत. परंतु एसटी महामंडळाच्या सांगली व मिरज विभागाकडून त्याची पूर्तता झाली नसल्याने हे काम थांबले आहे चार्जिंग पॉईंट साठी अखंडित वीजपुरवठा करण्याची आमची तयारीही आहे.


तर चांगली एसटी विभाग प्रमुख सुनील भोकरे म्हणाले की सांगली आणि मिरजेला प्रत्येकी 40 बसेस मिळणार आहेत यासाठी माधवनगर आणि मिरजेतील एक जागा निश्चित केली आहे आम्ही याबाबत महावितरण कडे पाठपुरावा करीत आहोत मात्र महावितरण कडून 100 वर्षाच्या करारावर बारा गुंठे जागेची मागणी झाल्याने शासनाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मध्यंतरीच्या लोकसभा निवडणुकीमुळे तो प्रलंबित आहे. लवकरच याची पूर्तता होऊन या दोन्ही ठिकाणी ई बसेस सुरू होतील.

आता या दोन्ही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणाचे बोलणे खरे म्हणायचे ? असा प्रश्न सांगली मिरजेतील प्रवाशांना पडला आहे.