| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जुलै २०२४
एकाच समाजाला तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ कसा घेता येतो असा सवाल करीत गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात उपस्थित केला होता त्यामुळे न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद मान्य करीत नव्याने रेट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच EWS कॅटेगिरी मधून अर्ज करता येणार नाही असे नोटिफिकेशन काढली असल्याचा दावा, गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दरम्यान गेल्या वर्षभरापासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 13 जुलै पर्यंतची मुदत दिली होती, ही मुदत आता संपली आहे त्यामुळे जरांगे पाटील कोणते पाऊल उचलणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असतानाच सदावर्ते यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे दुर्बल घटकातील स्पर्धा परीक्षेसाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे आता राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.