Sangli Samachar

The Janshakti News

गट तट विसरून शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे ना. सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जुलै २०२४
ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गट तट विसरून सोसायटी, पतसंस्थामधील चेअरमन, संचालक यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहान सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे. मिरजेत संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

मिरज शहरातील प्रगती पॅलेस येथे ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय सहकार मंत्रालय सहा जुलै 2021 मध्ये स्थापन करण्यात आला. देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी प्रशासकीय कायदेशीर व धोरणात्मक रचना केली गेली आहे. सहकार्यातून समृद्धी हे उद्दिष्ट ठेवून याची वाटचाल सुरू झाली असून, तळागाळातील सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी सर्वप्रथम सहकार खात्याचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित चहा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळेल, तसेच सहकारी संस्थांसाठी व्यवसाय सुलभीकरण प्रक्रिया सुरळीत करण्याचे व संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम सहकार मंत्रालयामार्फत होणार असल्याचे मत सहकार भारतीचे प्रदेश संघटक संजय परभणी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते सुशांत दादा खाडे, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, काकासाहेब बामणे, भारतीय प्रदेश संघटन प्रमुख संजय परमने, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन, संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.