yuva MAharashtra एक घटना आणि केंद्रीय सचिवालय हादरले; सीएसएस अधिकाऱ्यांना सतत सतर्कतेच्या सूचना !

एक घटना आणि केंद्रीय सचिवालय हादरले; सीएसएस अधिकाऱ्यांना सतत सतर्कतेच्या सूचना !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १२ जुलै २०२४
मंगळवारी अशी एक घटना घडली की ज्यामुळे केंद्रीय सचिवालयात धावपळ उडाली. केवळ एका संशयास्पद ई-मेलने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ॲक्शन मोर वर यावं लागलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय सचिवालयात सीएसएस अर्थात केंद्रीय सचिवालय सेवा अधिकाऱ्यांना एक संशयास्पद ई-मेल आला, त्यांची ई-मेल खाती रद्द केली गेली नाहीत ना ? हे पाहण्यासाठी त्यांना एका लिंक वर क्लिक करण्यास सांगितले होते.

सीएसएस अधिकारी केंद्रीय सचिवालयाचा कणा मानले जातो. यातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे यातील अधिकाऱ्यांना आल्यामुळे, केंद्रीय सचिवालय यंत्रणा सतर्क झाली. सीएसएस फोरमचे सरचिटणीस आशुतोष मिश्रा यांनी या संशयत ई-मेल ची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यानेही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय सचिवालयाच्या संपूर्ण कामकाज ऑनलाइन होत असल्याने अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान हा संशयास्पद ई-मेल केवळ अधिकाऱ्यांना फसवणुकीच्या दृष्टिकोनातून पाठवला गेला आहे, की यामध्ये आणखी काही षडयंत्र आहे ? याची शहानिशा करण्याचे काम माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केले आहे. यापुढे अशा कुठल्याही संशयास्पद ई-मेलवरील लिंक वर क्लिक न करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.