yuva MAharashtra भाजप नेत्याचा प्रताप, पाय खराब होतात म्हणून अधिकाऱ्याला पाठीवर घ्यायला लावले !

भाजप नेत्याचा प्रताप, पाय खराब होतात म्हणून अधिकाऱ्याला पाठीवर घ्यायला लावले !


| सांगली समाचार वृत्त |
सुरत - दि. २९ जुलै २०२४
मंत्री आणि नेते आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाच नव्हे तर अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दुय्यम वागणूक दिल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो, वाचतो. कोणी आपले कपडे धुण्यासाठी सांगतो, कुणी पाय धुण्यास सांगतो, अगदी पायात चप्पल घालायला सांगण्यापर्यंत या नेत्यांची- मंत्र्यांची मजल जाते. नुकताच असाच एक संतापजनक प्रकार बाबतीत समोर आला आहे. 

हा प्रकार सुरत मध्ये घडला असून, महाराष्ट्र प्रमाणे सुरतमध्येही अतिवृष्टीने शहराची नासाडी केली. सध्या सुरतचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना, उपमहापौर व भाजप नेते नरेंद्र पाटील हे शहराची पाहणी करण्यासाठी आले होते. परंतु लिंबायत भागातील एका रस्त्यावर पाहणी करीत असताना, तेथील मोठ्या प्रमाणावर असलेल्या चिखलाने आपले महागडे शुज व पॅन्ट खराब होईल म्हणून नरेंद्र पाटील यांनी तेथे बचाव कार्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला पाठीवर घ्यायला लावले. 


हा संताप जनक प्रकार पत्रकारांसह अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये शूट केला आणि सोशल माध्यमातून तो व्हायरल झाला. या प्रकारावरून आता भाजपासह सर्वच क्षेत्रातून यावरून प्रचंड टीका होत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेतली असून पक्षाच्या प्रतिमेला ठेच पोहोचविणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.