yuva MAharashtra विधान परिषदेच्या विजयाचा गुलाल लावून, शिंदे-फडणवीस यांच्याविना अजित दादा पोहोचले दिल्लीला...

विधान परिषदेच्या विजयाचा गुलाल लावून, शिंदे-फडणवीस यांच्याविना अजित दादा पोहोचले दिल्लीला...


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने यश खेचून आणले. दादांचे अचानक झालेले दिल्लीवारी मागचे नेमके कारण समोर आले नसले तरी, पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील दादांच्या सोबत आहेत. अजितदादा दिल्ली दौराद महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची, दोन वर्षापासून महामंडळावरील नियुकत्या हाही विषय महत्त्वाचा आहे. की मग, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्राकडून भरघोस निधी आणण्यासाठी आहे, हे गुलदस्तात आहे.


आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे, महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कारभाराबाबत. राष्ट्रवादी असो व शिंदे शिवसेना गट, यांना निधीबाबत दुजाभाव देत असल्याचे काही आमदारांची तक्रार आहे. आणि हीच तक्रार दिल्लीश्वरांच्या कानी घालण्यासाठी, ही भेट असल्याचे एका सूत्राने सांगितले. कारण कुठलेही असो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विना झालेली दादांची दिल्लीवरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहे.