yuva MAharashtra गडकरी यांनी टोचले भाजप नेत्यांचे कान, म्हटले मग काँग्रेस आणि आपल्यात फरक तो काय ?

गडकरी यांनी टोचले भाजप नेत्यांचे कान, म्हटले मग काँग्रेस आणि आपल्यात फरक तो काय ?


| सांगली समाचार वृत्त |
पणजी - दि. १३ जुलै २०२४
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्याने सर्वपरिचित. प्रसंगी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही टोकण्याची त्यांचे खासियत. अनेकदा त्यांनी याबाबत केंद्रीय नेतृत्वाचे नाराजी हे ओढावून घेतले आहे. परंतु पक्षहित लक्षात घेऊन त्यांनी हा धोकाही पत्करला असल्याचे बोलले जाते.

नुकत्याच झालेल्या गोवा येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मोठे विधान केले. आपल्या 40 मिनिटाच्या भाषणात गडकरी यांनी आपले राजकीय गुरु आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या एका विधानाचे स्मरण करीत देत म्हटले की, भाजप हा इतरांपेक्षा वेगळा असलेला पक्ष आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे समजून घेतले पाहिजे. काँग्रेसच्या चुकामुळे लोकांनी भाजपला निवडून दिले आणि आता भाजप त्याच चुका करीत असतील तर सावधगिरी बाळगण्याचे गरज आहे असे वक्तव्य गडकरी यांनी केले.


राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे साधन आहे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे आम्हाला भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आमची योजना असायला हवी जातीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला आहे गडकरी यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिला. आता गडकरी यांचा हा सल्ला किती अंमलात आणला जातो, हा भाग अलहिदा... कारण भाजपाचा अजेंडाच मुळे जातीपातीवर असल्याचे बोलले जाते.