| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जुलै २०२४
येथील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीच्या कु. निशा इंगळे हिने GPAT-2024 परीक्षेत संपूर्ण भारतात 55 वा नंबर घेऊन गगनचुंबी यश मिळवल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंड पाटील यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. इंगळे ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम गुण मिळवणारी विद्यार्थिनी असून तिने नायपर जीईईमध्येहीश भारतात एमटेक साठी 29 वा एम एस/ एम फार्म साठी 321 वा क्रमांक मिळवला आहे.
कसबे डिग्रस सारख्या ग्रामीण भागात हे महाविद्यालय सर 2016-17 पासून सुरू असून बी फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश क्षमता 100, डी फार्मसी प्रवेश क्षमता 60, एम. फार्मसी प्रवेश क्षमता 45 ( फार्मास्युटिक्स -15, फार्मासिटिकल केमिस्ट्री - 15, फार्माकोलॉजी - 15) आहे. सन 2024 25 पासून संशोधन केंद्र (पीएच. डी) शिवाजी विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. सदर महाविद्यालय मध्ये समाज उपयोगी संशोधनाचे काम यशस्वीरित्या सुरू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील आग्रहण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
कु. इंगळे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील, संस्थापक प्रा. डी. डी. चौगुले, व्हा. चेअरमन पोपटराव डोर्ले, सचिव अजितप्रसाद पाटील, संचालक महावीर चौगुले, प्रशांत अवधूत, अजित फराटे, सुदर्शन शिरोटे, स्वदेशी ट्रस्टचे सागर पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ किरण वाडकर यांनी केले.